शबनम न्युज / पिंपरी
आदित्य जनसेवा उपक्रमा अंतर्गत युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी युवतीसेना प्रमुख प्रतिक्षा घुले यांच्या वतीने दिघी येथील ज्ञानदीप अनाथ आश्रमास अन्नधान्य व खाऊ वाटप करण्यात आले.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डीग्ज, केक असा निरर्थक खर्च टाळुन समाजहित जपण्याचे आव्हान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले होते, त्या आव्हानाला प्रतिसाद देत युवासेनेच्या वतीने समाजहिताची कामे आदित्य जनसेवा सप्ताहा मध्ये केली जात आहेत, पिंपरी युवासेनेच्या वतीनेही या सप्ताहात अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवले गेले. आदित्य ठाकरे पर्यावरण प्रेमी आहेत. त्यामुळे वृक्षारोपण, वृक्षसंगोपन व पर्यावरण पुरक उपक्रम राबण्यावर आमचे लक्ष असेल,असे मत यावेळी प्रतिक्षा घुले यांनी व्यक्त केले.
या वेळी दक्षता समिती सदस्य रवि (सर) कोवे, विभाग संघटिका मनिषा परांडे,ज्ञानदीप बालकाश्रमचे शिंदे सर,उपविभाग प्रमुख नामदेव घुले, शाखाप्रमुख संतोष गायकवाड, बाळासाहेब चव्हाण,निला राजगुरु,युवासेनेचे सनी कड, नंदकुमार देवकर,मोनिका चव्हाण उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विधानसभेच्या युवतीसेना प्रमुख प्रतिक्षा घुले यांनी केले होते.