शबनम न्युज / पिंपरी
युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी युवासेना वतीने आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी वाहतूक विभागात काटेकोरपणे आपले कर्तव्य बजावत असलेल्या भोसरी वाहतूक पोलिस स्टेशन येथे सॅनिटायझर,मास्क व सॅनिटायझर स्टॅन्ड देण्यात आले.
युवासेनेतर्फे कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्याप्रसंगी पो.हवालदार कोडेकर,म.पो.ना बनकर,म.पो.ना. भोकरे,हेड.काॅ. जंगम,पो.ना अरगडे,पो.ना.मांजरे,पो.काॅ.चमकुरे,पो.काॅ. हिप्परकर, दीपक शिंदे, सायमन गायकवाड, रवी नगरकर,याप्रसंगी उपस्थित होते.
Advertisement
सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.