शबनम न्युज / पुणे
कोविड १९ बाबत पुणे विभागाची जनजागृती समिती कार्यरत असून या समितीचे अध्यक्ष श्री.मल्लिनाथ कलशेट्टी हे आहेत. ते कोरोना बाबत संकट उद्भऊ नये याकरिता सातत्य पूर्ण जनजागृती प्रयत्न करीत असून नुकतेच कोरोना जनजागृती विषयावर नवीन चार व्हिडिओ तयार केले आहे. त्याचे प्रकाशनही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन मध्ये उत्कृष्ट जन जागृती केलेले सांगली जिल्ह्याचे शाहीर श्री. अंबी गुरुजी यांच्या पथकाकडून चला सारे निर्धार करू या, कोरोनाला हरवू या व कोरोना व्हायरस आला, हिमतीने जिंकू त्याला हे दोन जनजागृती पोवाडा व गीत तयार केले आहेत. तसेच बाल शाहीर अमोघराज आंबी यांनी आम्ही बालवीर या देशाचे, कोरोनावर करू मात अशा संदेश गीतातून दिला असून पालकांनी घ्यावयाची काळजी व लसीकरण घेण्याबाबत संदेश दिला आहे. तसेच मंगळवेढा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. दत्तात्रय येडवे व श्री. संजय बिदरकर यांनी आपल्या संभाषनातून लक्षणे दिसताच तपासणी करून तत्काळ उपचार घेण्याबाबत संदेश दिला आहे. तसेच सर्वांनी कोरोना बाबत नियम पाळूया असे आवाहन केले आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीत दुकान व आस्थापना या ठिकाणी मास्क नाही, प्रवेश नाही असे संदेश देणारे स्टिकर्स तयार करून पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकानात घनकचरा व्यवस्थापन पथकामार्फत लावले जात आहेत. यासाठी विश्वेश्वर बँक, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ बडोदा , कोटक बँक यांनी स्टिकर्स बनवून देण्याचे सहकार्य केले आहे. याप्रकारे महानगरपालिका व ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. याकरिता भूजल संचालक . मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. यासमिती मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री.सिद , गटविकास अधिकारी, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे श्रीमती रजनंदिनी भागवत, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उज्वला शिर्के, युनिसेफचे प्रतिनिधी श्री. प्रवीण पवार व डॉ. अनुजा संखे यांचा समावेश असून पुढील कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रभावी प्रचार प्रसिध्दी केली जात आहे. या समितीने पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातून गुगल फॉर्मद्वारे सर्वे करून पुढील जन जागृती कोरोना प्रतिबंधासाठी लोक संवादातून कृती आराखडा करून प्रचार प्रसिध्दी केली जाणार आहे, असे श्री मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.