शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 23 मध्ये कोरोना निर्बंध सप्ताह आयोजित करण्यात आला या सप्ताह अंतर्गत अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले या सप्ताहाचा 12 जून रोजी समारोप कार्यक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात पंचवीस ते तीस जणांनी आपले रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह वाफ मशीन भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी ओम ब्लड सेंटर पुणे या संस्थेच्या डॉक्टर ,नर्सेस व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
तसेच या कोरोना निर्बंध सप्ताहा अंतर्गत कोरोना योद्धा चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यामध्ये एकूण शंभर कोरोना योद्धा चा सन्मान, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक कैलास बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेविका अर्चना बारणे, स्वीकृत सदस्य संदीप गाडे, युवा नेते प्रमोद पवार भाजप युवा नेते काळूराम बारणे, सामाजिक कार्यकर्ते संजय गायके, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते,
नगरसेविका मनिषा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कोरोना निर्बंध सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले
- प्रभाग क्रमांक 23 मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले नगरसेविका मनिषा पवार व युवा नेते प्रमोद पवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन प्रभागात साफसफाई केली.
- प्रभाग क्रमांक 23 मध्ये नागरिकांना एकूण दोन हजार आरोग्य कीट चे वाटप करण्यात आले.
- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांची ऑनलाइन नोंदणी या सप्ताह अंतर्गत करण्यात आली.
- प्रभाग क्रमांक 23 मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून प्रभागातील मुख्य विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
- आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक 23 मध्ये कीटक नाशक औषध फवारणी करण्यात आली.
- प्रभाग क्रमांक 23 मधील गरजू व गरीब कुटुंबांना अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
- कोरोना निर्बंध सप्ताह अंतर्गत बालेवाडी येथील कोरोना सेंटर मधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
- या सर्व विविध उपक्रमा अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच संपूर्ण आठवडाभर “कोरोना”, “काळी बुरशी” यावर मार्गदर्शन तसेच “कोरोना समज गैरसमज” या विषयावर तज्ञांकडून माहितीपर कार्यक्रम घेण्यात आले