शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त पद तात्काळ भरावे अशी मागणी करणारे पत्र रयत विद्यार्थी परिषद वतीने मनपा आयुक्त्यांच्याकडे दिले आहे. पत्रात नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त हे पद गेली काही महिने पासून रिक्त आहे.अतिरिक्त आयुक्त पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर त्याचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येत आहेत.
प्रशासन गतिमान,पारदर्शक आणि लोकाभिमुख हे प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे विकास कामांना व आरोग्य यंत्रणांच्या कामांना गती देता येत नसल्याचे निदर्शनास येते.
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या वैद्यकीय रजेमुळे अनेक विषय मार्गी लागण्याचे कामास विलंब होत आहे.
आपण पिंपरी चिंचवड मनपा चे आयुक्त या नात्याने नगरविकास खाते महाराष्ट्र शासन यांच्याशी पत्रव्यवहार करून तात्काळ रिक्त असलेली अतिरिक्त आयुक्त ही जागा शासकीय नियमाप्रमाणे भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी. अशी मागणी रयत विद्यार्थी परिषद आपणाकडे करत आहे.असे पत्रात नमूद केले आहे