शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
ऋतुराज गायकवाड यांचा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला सार्थ अभिमान असल्याचे पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी गौरव उदगार काढले, महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आज ऋतुराज गायकवाड याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली
भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलैमध्ये एकदिवसीय व T-20 मालिका होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यानिमित्ताने ऋतुराजचे कौतुक होत आहे. पिंपरी चिंचवडमधून भारतीय संघात निवड होणारा ऋतुराज गायकवाड हा पहिला खेळाडू ठरला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे यांनी ऋतुराज गायकवाड च्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन करत त्याच्या आई व वडील समवेत ऋतुराज गायकवाड यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
ऋतुराज गायकवाड यांनी आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचे नाव क्रीडा जगतामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले तसेच क्रीडा जगतात पिंपरी-चिंचवड शहराचे नावही उंचावले आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो या शब्दात महापौर यांनी ऋतुराज गायकवाड यास शुभेच्छा दिल्या. महापौर समवेत .अरविंद ढोरे,.जवाहर ढोरे,.ज्ञानेश ढोरे. आदी उपस्थित होते
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट) जुलै महिन्यात होणार्या श्रीलंका दौर्यासाठी संघ जाहीर केला आहे. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती देण्यात आली आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदास आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.