शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील परिसरामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे या मागणीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल मुकुंद उबाळे यांनी मनपा आयुक्तांकडे दिले आहे
दिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रभाग क्रमांक 13 निगडी ,गावठाण सेक्टर 22 ,यमुना नगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर ,श्री कृष्ण मंदिर परिसर साईनाथ नगर इत्यादी परिसरामध्ये दाट लोकवस्ती असून गेल्या काही वर्षात या परिसरात हाणामारी होणे , गाड्यांची जाळपोळ होणे, सोनसाखळी चोरी जाणे , दरोडा, महिलावर्गाला व मुली यांना त्रास देणे तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणे अशा अनेक छोटे-मोठे गुन्हे या परिसरात सर्रासपणे होत असून अशा वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी तसेच या वाढत्या गुन्हेगारीच्या होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना मुक्तता मिळावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच सदरच्या सीसीटीव्ही कॅमेरे ची जोडणी स्थानिक पोलिस स्टेशन मार्फत पोलीस आयुक्तालय मध्ये करावी जेणेकरून त्यामुळे जलद गतीने पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल तसेचया संवेदनशील ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहून गुन्हेगार त्वरित पकडले जाण्यास पोलिस प्रशासनाचा ही होईल तसेच प्रभाग सुरक्षित राहण्यास नक्कीच मोलाची मदत होईल याकरिता प्रभाग क्रमांक 13 मधील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर बसविण्यात यावे अशी मागणी विशाल मुकुंद उबाळे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.