शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग २८ मधील येथील कुणाल आयकॉन रोडवरील महानगरपालिकेच्या मार्फत विकसित होणारे खेळाचे मैदान लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी व्यक्त केला आहे. नाना काटे यांनी आज मैदानावरील किरकोळ कामे लवकर पूर्ण करून मैदान लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत मैदानाची पाहणी केली.
यावेळी स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनील पाटील , शाखा अभियंता नरेश जाधव, बी व्ही जी इंडीया चे व्यवस्थापक अधिकारी पाटील, सल्लागार सचिन आपटे, संदीप काटे, शशी काटे, भुषण काटे, मच्छिंद्र काटे, आदी उपस्थित होते. या मैदानाची नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांनी पाहणी केली. या मैदानावरील किरकोळ कामे लवकर पूर्ण करून मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, असे नाना काटे यांनी सांगितले.
पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन शेजारी महापालिकेचे खेळाचे मैदान विकसित होत आहे. या मैदानामध्ये फुटबॉल, क्रिकेट ग्राउंड, टेनिस कोर्ट, ओपन जिम, लहान मुलासाठी विविध खेळासाठी व्यवस्था जेष्ठ नागरिकांनसाठी बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, सिंथेटिक ट्रॅक, टर्ब ग्राउंड, प्रेक्षकासाठी बैठक व्यवस्था, टॉयलेट ब्लॉक इत्यादी सोयी सुविधांनी युक्त असे मैदान नागरिकांसाठी विकसित होत आहे.