शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड येथील दापोडी मधील परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 17 व 25 कार्यरत आहे. परंतु हे कार्यालय जागे अभावी अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. हे दोन्ही कार्यालयांचे स्थलांतर करू नये, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात नगरसेविका स्वाती माई काटे यांनी म्हटले आहे की, या कार्यालयांचे स्थलांतर केल्यास दापोडी सांगवी कासारवाडी, फुगेवाडी,नवी सांगवी, जुनी सांगवी येथील नागरिकांची गैरसोय होणार आहे. येथील नागरिकांना दूरच्या ठिकाणी जावे लागणार आहे. यामध्ये त्यांचा वेळ वाया जाणार आहे. तसेच आर्थिक भुर्दंड ही बसणार आहे. तरी दापोडी परिसरात या दोन्ही कार्यालयास दापोडी, गणेश नगर येथील गणेश कन्स्ट्रक्शन विकसक कडील प्रशस्त जागा ताब्यात घेऊन तिथे ही कार्यालय स्थलांतरित करण्यात यावे, जेणेकरून या परिसरातील नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तरी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 17 व 25 ते स्थलांतर करू नये, असे नगरसेविका स्वाती माई काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच सदर ची मागणी दुय्यम निबंधक कार्यालय अधिकारी यांच्या कडेही केली असल्याची माहिती युवा नेते शेखर काटे यांनी दिली आहे.