शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात विद्या नगर चिंचवड येथून एका अल्पवयीन मुलासोबत चाललेल्या तरुणाचे अपहरण झाल्याचा फोन त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला केला घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सह वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी संपूर्ण तपासाला सुरुवात केली असता वेगळीच माहिती समोर आली
17 जून रोजी सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता निगडी पोलीस स्टेशन ला राजाभाऊ शिंदे याचा फोन आला त्याचा भाचा संतोष देशमुख यास गरवारे कंपनी कडून ॲक्टिवा गाडीवरून जात असताना पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडी मधील चार ते पाच जणांनी अपहरण करून आकुर्डी दिशेने गेल्याचे सांगितले त्यानंतर कंट्रोल रूम ने सर्व पोलीस स्टेशनला ब्रॉडकास्ट करून घटनेची माहिती देतात गरवारे कंपनी समोर चिंचवड पुणे येथे तात्काळ निगडी पोलिस दाखल झाले राजाभाऊ शिंदे याने किडनॅप केलेल्या भाषेत सोबत त्याचा मुलगा संकेत शिंदे हाही असल्याची माहिती दिल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आम्ही दोघे घरातून निघून पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा यावर बसून कंपनीकडे कामावर जात असताना सकाळी ७.५० वाजता गरवारे कंपनी गेट समोर आलो असताना अचानक तीन अनोळखी इसमांनी रस्त्यावर आडवे उभे राहून आम्हाला थांबविले व संतोष देशमुख याचे अपहरण करून पांढऱ्या रंगाच्या स्कार्पियो मध्ये आकुर्डी च्या दिशेने गेले असता त्याने त्यांचा पाठलाग केला असल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलविली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असताअपहरण झालेली व्यक्ती अजंठा नगर चिंचवड येथे असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी त्याला तिथे जाऊन ताब्यात घेतले मामाच्या गावी जाण्यासाठी घरातील व्यक्ती विरोध करतील म्हणून अपहरण झालेला तरुण आणि अल्पवयीन मुलाने अपहरणाचा बनाव केल्याचे तपासात समोर आले कोणतीही शहानिशा न करता पोलिसांना खोटी माहिती दिली व अपहरणाचा बनाव असल्याने निगडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत
एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीतून 21 वर्षीय भाच्याने त्याच्या 17 वर्षीय मामे भावासोबत मिळून स्वतःचे अपहरणाचा बनाव रचला व अपहरण झाले आहे असे मामाला सांगितले मामाने घटनेची शहानिशा न करता पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भाच्याला अजंठा नगर चिंचवड येथून ताब्यात घेतले या प्रकरणाचा बनाव पोलिसांच्या समोर तात्काळ आला पोलिसांनी तिघांच्या विरोधात पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे