पिंपरी १६ जून २०२१: पिंपरी चिंचवड हे देशातील एक प्रमुख महानगर आहे. पिंपरी चिंचवडची केंद्र शासनाच्या
स्मार्ट सिटी मिशन योजनेमध्ये समावेश झाल्यानंतर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.ची स्थापना करण्यात आली.
स्मार्ट सिटी लि.च्या माध्यमातून शहरामध्ये विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली आहे. या
विकासकामांमुळे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधांची निर्मिती होत असून शहराच्या सौंदर्यात
भर पडत आहे.
एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या परिसरामध्ये विविध विकासकामे करण्यात
येत आहेत. पिंपळे गुरव भागामधील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये आबालवृद्ध नियमितपणे येतात. या उद्यानातील
डायनासोरचे पुतळे प्रसिद्ध आहेत. या उद्यानाच्या समोर असलेल्या पार्किंग एरियामध्ये विकासकामांच्या माध्यमातून
कायापालट करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी वाहनतळ विकसित करण्यात
येणार आहे. त्या अंतर्गत नागरिकांना बसण्यासाठी गजेबो, बाक, फूड प्लाझा, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी
प्रशस्त पार्किंग, सोलर ट्री, इलेक्ट्रिक व्हेइकल्स चार्जिंग स्टेशन, आकर्षक लँडस्केपिंग, टॉयलेट्स इत्यादींची कामे
करण्यात येत आहेत. तसेच प्रकाशयोजनेसाठी विजेचे आकर्षक खांब बसवण्यात आले आहेत. तसेच उद्यानाच्या
संरक्षक भिंतीवर स्टोन क्लॅडींग करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ उद्यानाच्या परिसरामध्ये आकर्षक फुटपाथ,
सायकल ट्रॅक आणि प्रकाशयोजना करण्यात आली आहे. या परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे सर्व परिसर
हिरवाईने नटलेला आहे.