पिंपळे सौदागर कोकणे चौक येथील दीपमाला सोसायटी मध्ये रस्त्यालगत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे गेल्या ४ दिवसांपासुन ड्रेनेज लाईन मधून मैला मिश्रित सांडपाणी सोसायटीमध्ये साचत होते मागील दोन दिवसांपासुन महानगरपालिकेच्या मल:निसारण विभागामार्फत व नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांच्या माध्यमातून पाण्याचा उपसा केला जात होता परंतु समस्या कायम स्वरूपी सुटत नव्हती त्यामुळे सोसायटी परीसरात खूपच दुर्गंधी सुटली होती यामुळे नागरिकंच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता ही गंभीर बाब लक्षात घेता माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महानगरपालिकेच्या मल नि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांना व स्मार्ट सिटी विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून दोन सक्शन गाडी व पोकलेन च्या सहाय्याने ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा करून दिला तसेच त्यामुळे सोसायटी परिसरात पाणी साचणार नाही. यावेळी चालु ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाची पाहणी केली त्या ठिकाणी लवकरात लवकर नविन मल:निसरण च्या नविन पाईप लाईन टाकण्याच्या सुचना केल्या यावेळी मल नि: सारण विभागाचे सहशहर अभियंता. रामदास तांबे, स्मार्ट सिटीचे अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता सुर्यवंशी, शाखा, भाग्यश्री ढोले, नरेश जाधव, शिर्के कंपनीचे घाडगे, व दिपमाला सोसायटीचे सहजीव सुरेंद्र रामामूर्ती, युवराज सोनावणे, विलास बाविस्कर, शशांक इंदुरकर, अभिषेक वर्मा आदी उपस्थित होते सोसायटीच्या वतीने त्यांनी नाना काटे यांनी घेतलेल्या तत्परतेचे कौतुक करून आभार मानले.