रस्ता तात्काळ नागरिकांसाठी खुला करावा : शेलार
पुणे प्रतिनिधी : 1964 सालापासून च नागरिकांच्या वहीवाटी करिता खुला असलेला रस्ता वानवडी भगातील सर्वे नंबर 54 एस आर पी एफ गट नंबर 2 यांनी खाजगी वापराकरिता गेट लावून बंद केला आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून पाच ते सहा किलोमीटर लांबून रस्त्याचा वापर करावा लागत आहे. रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता हा पुणे महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन मधे दर्शिवला आहे. परिसरातील वृद्ध, शाळेत जाणारे विद्यार्थी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्या बाबत वानवडी येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमित शेलार यांनी पाठपुरावा केला. कोरोना काळाचा फायदा घेत या रस्त्यावर गेट बांधून बंद केल्याचा आरोप शेलार व नागरिक यांनी केला आहे. त्याचबरोबर रस्त्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी भेटून निवेदन व चर्चा केली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जगताप चौक, विकास नगर, एस आर पी एफ गट नंबर 1, गट न २, शांती नगर, काळूबाई मंदिर परिसर, तात्या टोपे, जय जवान सोसायटी येथील जवळ जवळ तीन हजार नागरिकांना या रस्त्या अभावी पर्यायी रस्त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदरील रस्ता तात्काळ नागरीकांच्य वापरासाठी खुला करावा, याकरिता अमित शेलार व सहकारी मित्र परिवार यांनी जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त पुणे महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी पुणे, तहसीलदार पुणे यांना निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.