भोसरीतील गवळीनगर येथिल संत निरंकारी भवन येथे महानगरपालिकेतर्फे लहान मुलांचे मोफत लसीकरण… नगरसेविका प्रियांका बारसे
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
कोरोना काळात रुग्णालयांमध्ये बालकांच्या लसीकरणासाठी जागा आणि वेळ कमी पडत असल्यामुळे सत्संग भवन भोसरी येथे लसीकरणाला सुरुवात झालेली आहे .
शून्य ते पाच वर्षाच्या बालकांचे हे लसीकरण करण्यात येणार आहे.
हे लसीकरण दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत मध्ये होणार असल्याची माहिती पालिकेच्या डॉक्टरांनी दिलेली आहे .
या लसीकरण मोहिमेमध्ये बालकांना बीसीजी पोलिओ पेंटा गोवर रूबेला लसीकरण करण्यात येणार आहे तसेच गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे.
गवळीनगर प्रभागाच्या नगरसेविका प्रियांका बारसे यांनी या कोरोना काळात सर्व गरोदर माता व ० ते ५ वर्षाच्या मुलांच्या माता यांना याठिकाणी जाऊन या योजनेचा लाभ घेण्याचे व स्वतःची व बालकांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
तसेच संत निरंकारी भवनाचे सर्वेसर्वा अंगद जाधव यांनी ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत