शबनम न्युज / पिंपरी
महापालिकेच्या कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. २० आणि ३० मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली या बैठकीस ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य शाम लांडे, रोहीत काटे, राजु बनसोडे, माऊली थोरात, नगरसदस्या आशा शेंडगे, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, स्वाती उर्फ माई काटे, स्वीकृत सदस्य संजय कणसे, ह क्षेत्रीय अधिकारी अभिजीत हराळे, सहशहर अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता संजय भोसले, अनिल राऊत, प्रमोद ओंभासे, दत्तात्रय रामगुडे, सुनिल वाघुंडे, अनिल सुर्यवंशी, रामनाथ टकले, संजय कुलकर्णी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, सहाय्यक आरोग्याधिकारी रमेश भोसले आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.