शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील भाटनगर परिसरात राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराचे सरचिटणीस अक्षय माछरे व त्यांच्या मित्र परिवार वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
या लसीकरण मोहीम अंतर्गत भाटनगर दवाखाना येथे लसीकरण केंद्राचे संचालन अक्षय माछरे व त्यांच्या मित्र परिवार मार्फत होत आहे, सदर लसीकरण मोहिमेची सुरुवात 23 जून रोजी करण्यात आली वय 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला भटनागर दवाखाना येथे सकाळी दहा ते पाच या कालावधीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराचे सरचिटणीस अक्षय माछरे यांनी केले आहे.
Advertisement