शबनम न्युज / मावळ
मावळ मधील सम्राट अशोक योद्धा संघटना या सामाजिक संस्थेच्या वतीने या परिसरात मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना आधुनिक पद्धतीने मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. मेंढपाळ व्यवसाय हा स्थलांतरित आहे. स्थायिक होण्यासाठी व नवीन तंत्र पद्धतीने मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी या व्यवसायातील तरुण पिढीला संघटनेच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तसेच हा मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी या व्यावसायिकांना रानात वनात राहावे लागते. सध्या पावसाचे दिवस असल्याने या व्यावसायिकांना मावळ येथील भंडारी डोंगर येथे छत्री वाटप करण्यात आल्या. पावसाळा पासून संरक्षण होण्यासाठी हा उपक्रम संघटनेच्या वतीने राबविण्यात आला.
यावेळी सम्राट अशोक द्धायो संघटनेचे संस्थापक विजय सरक, सम्राट अशोक योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामजी कोळेकर, भीमा करे, नाथा कोळेकर, सागर कोळेकर, बाबू शेडगे, शैलेश दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.