मित्राच्या घरी वास्तुशांतिला जाने पडले महागात
शबनम न्युज / देहुरोड
मित्राच्या घराच्या वास्तुशांतिला गेले असता , आज्ञात चोरानी घरफोडी करुण सोन्याचे दागिने लंपास केले . देहुरोड येथील आदर्श नगर येथे रविवार दि.२० दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
उत्तम नंदकुमार लोनकर वय 33 राहणार आदर्श नगर देहुरोड यानी सोमवार दि.२१ या बाबत देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादि है घराला लॉक करुण मित्राच्या वास्तुशांति च्या कार्यक्रमा साठी गेले होते त्या दरम्यान च्या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दरवाज्याचे लॅच-लॉक कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश करुण घरातील कपाटातुन १ लाख ६५ हजार ५०० रूपयांचे सोन्या-चांदिचे दागिने चोरुन नेले .
पुढील तपास देहुरोड पोलीस करत आहेत.