शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिक्षण समिती सभापती व विद्यमान नगरसेविका मनिषा पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापन कमिटीची शालेय फी वसुलीची सक्ती न करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.
दिलेल्या पत्रात मनिषा पवार यांनी म्हटले आहे की covid-19 या संसर्गजन्य रोगाची साथ चालू असल्याने गेले काही महिने शासनामार्फत लॉकडाऊन बाबतचे आदेश देण्यात आले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही औद्योगिक नगरी हद्दीत उद्योगधंदे जास्त असल्याने बाहेर गावावरुन कामानिमित्त या क्षेत्रात नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याने कंपन्या उद्योगधंदे यावर आर्थिक परिणाम झालेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी शाळा बाबत शहरातील पालक विविध संघटना पदाधिकारी यांच्यामार्फत अशा परिस्थिती सी दरवाढीबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत सर्व शिक्षण समिती सभापती म्हणून अशा तक्रारींवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापन कमिटीची शालेय फी वसुलीची सक्ती न करण्याबाबत संदर्भात बैठक आयोजित करून योग्य ते निर्णय घेता येईल याकरिता बैठक आयोजित करावी अशी मागणी शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे