संभाव्य कोरोना तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयांमध्ये बाळांसह आईची व्यवस्था (Baby with Mother) करावी तसेच औषधांचा तुटवडा होणार नाही याची तजवीज प्रशासनाने करावी अशी मागणी राष्ट्रवादी चे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे. दिलेल्या निवेदन नमूद केले आहे कि आपल्या देशामध्ये कोरोना च्या तिसऱ्या लाटेची संभावना असून याकरिता प्रशासन म्हणून संभाव्य लाटेमध्ये वैद्यकीय व्यवस्था उपचार व्यवस्था व्यवस्थित राहतील यासाठी प्रयत्नशील आहात.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण रुग्णालयांची उपलब्धता लहान मुलांकरिता बेडची व्यवस्था व नियोजन करत असल्याचे समजते.
केवळ रुग्णालय ,बेड यांच्यासह आवश्यक व योग्य औषधांची देखील कमतरता पडणार नाही यासाठी देखील नियोजन व्हावे म्हणून या पत्राद्वारे मागणी व विनंती आहे. लहान मुलांना प्रसन्न वाटेल अशा रुग्णालयातील व्यवस्थेसह संभाव्य लहान मुले व बाळांसह त्यांच्या आईला सुध्दा याठिकाणी राहता येईल( Baby with Mother ) अशी व्यवस्था देखील आपणास उपलब्ध करावी लागणार आहे याची दक्षता घ्यावी लागेल.
दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिविर व इतर इंजेक्शनचा संपूर्ण देशातील तुटवडा , काळा बाजार आपण अनुभवला आहे व त्या दूरदरम्यान अनेकांना प्राण गमवावे लागले हे आपल्याला ज्ञात आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी काही विशिष्ट प्रकारची इंजेक्शन्स उपयोगास येतात असे समजते व यासाठी Human Normal Immunoglobulin For Intravenous Use साठी तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून उपयुक्त असणारे इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही व उपलब्धता रास्त दरात होऊ शकेल अशी तजवीज करावी यासाठी आपण तातडीने अशा प्रकारचे इंजेक्शन किंवा उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांबरोबर चर्चा करावी व शहरासाठी याचे नियोजन करावे म्हणून या पत्राद्वारे मागणी व विनंती करीत आहे.
तरी कृपया आपल्या नियोजनामध्ये सदर बाबींचा विचार व्हावा तसेच आम्ही देखील एक कर्तव्य म्हणून आपण द्याल ती जबाबदारी पार पाडू म्हणून देखील या पत्राद्वारे खात्री देत आहोत.
सर्वच नागरिक लहान मुले व बाळांमध्ये कोरोना ची तिसरी लाट पसरू नये हीच भावना असून त्यासाठीच जास्त संवेदनशील आहेत त्याकरिता योग्य ते नियोजन व्हावे हीच मागणी व विनंती प्रशांत शितोळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा.राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.