शबनम न्यूज / पिंपरी
महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याचा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप वतीने आज राज्यभर आंदोलने करण्यात आली पिंपरी-चिंचवड शहरातही चक्काजाम आंदोलन करण्यात आले भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप नेत्या पंकजा मुंडे व आमदार महेश लांडगे पोलिसांच्या ताब्यात
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चौकात चक्काजाम आंदोलन करताना माजीमंत्री भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या आंदोलनात कोरोना नियमांचे कार्यकर्त्यांनी उल्लंघन केले तसेच सुरक्षित अंतराचे पालन केले नाही