शबनम न्युज / पिंपरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालविणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची ओळख आहे. जातिभेद दूर करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, सर्व सामान्य जनतेचा राजा म्हणून त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
त्यानंतर के.एस.बी. चौक, टेल्को रस्ता, चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य केशव घोळवे, तुषार हिंगे, बाबू नायर, नगरसदस्या अनुराधा गोरखे , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम, पांडुरंग पाटील, नामदेव शिंत्रे, सुनिल पाटील, जगदीश परिट, मिलिंद वेल्हाळ, विश्वनाथ स्वामी, बापूसाहेब तोंदकर, दिगंबर वळूगडे, राजू पाटील, वसंत पाटील, सखाराम इक्के, महादेव बुजरे, संजय पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक वर्षे राज्य कारभार केला. दाट लोकवस्तीच्या गावात शाळा काढल्या. कुस्ती, लोककला, संगीत, नाटक तसेच चित्रपट कलाकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. राधानगरी धरणासारखे प्रकल्प त्याकाळी उभारले. अशा त्यांनी केलेल्या शेकडो लोकोपयोगी कामांचा आदर्श भावी पिढीने जोपासला पाहिजे असे महापौर माई ढोरे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.