शबनम न्युज / पिंपरी
रहाटणी येथील फॉर्च्यून हॉस्पिटल चे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका उषाताई अंकुश मुंडे, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर ,सांगवी काळेवाडी मंडलाचे सरचिटणीस दीपक जाधव, हॉस्पिटलचे डॉ चंद्रशेखर अन्नदाते डॉ.अतुल दायमा, डॉ राजेंद्र साठे, डॉ दीपक भाले व सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement
रहाटणी येथील फॉर्च्यून हॉस्पिटल, रायगड कॉलनी चौक, नखाते वस्ती – कुणाल हॉटेल लिंक रोड येथे नवीन झाले असून सर्व अत्याधुनिक सुविधा युक्त असलेले पाच मजली हॉस्पिटल आहे.
याप्रसंगी महापौर यांनी बोलताना सांगितले की, हॉस्पिटल नि चांगल्या सुविधा द्या जनतेसाठी चांगली सेवा द्या व जनतेचा आशीर्वाद घ्या.
Advertisement