शबनम न्यूज / पिंपरी
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे
आयोजन केले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आज पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम दापोडी , सांगवी,लांडेवाडी,भोसरी,दिघी, चिखली तसेच विकासनगर येथे पार पडला, या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे पाटिल , नगरसेवक विक्रांत लांडे , मा. नगरसेवक प्रशांत शितोळे , प्रवक्ते फजलभाई शेख़ , अरुण बोऱ्हाडे , प्रकाश सोमवंशी, सारिकाताई पवार, अजय चव्हाण,पोपट पडवळ, उज्वला ढोरे, माहेश्वरी परान्ड़े, राधिका घोडके, मनिशा पूरी, कोमल कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अंध शाळेतील मुलांचाही सहभाग होता.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष वर्षा जगताप तसेच ऋतुजा बिराजदार ,नेहा पडवळ लालबी शेख़ लोखंडे,शलाका बनकर, सोनाली घाडगे,श्रद्धा कुटे, तृप्ती गोरे, राजश्री आहिरे, अंकिता इथापे, भव्यशीला गायकवाड, रविराज काळे यांनी केले होते.