शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील कु.सोनल राजेश गोसावी यांची भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर युवती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र भाजपाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले.
Advertisement
या वेळी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजप युवा नेते संकेत चोंदे, नगरसेवक हर्षल ढोरे, राजेश पिल्ले, वैशाली ताई खाडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, अमोल थोरात ,माजी नगरसेवक राजू दुर्गे, युवा नेते जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल सोनम गोसावी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सर्व उपस्थितांनी सोनम गोसावी यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Advertisement