शबनम न्युज / पुणे
- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा मार्फत कर्ज योजना
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation) यांच्या मार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यु पावली आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एन.एस.एफ.डी.सी, नवी दिल्ली यांचे मार्फत रुपये 5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. एन.एस.एफ.डी.सी. तर्फे कर्ज 4 लाख रुपये भांडवली अनुदान 1 लाख व्याजदर 6 टक्के.
मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात, पोट जात, मृत्यूची दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. कुटूंबातील व्यक्तींची एकूण संख्या कुटूंबातील प्रमुख वारसदार, कुटूंबातील वार्षिक उत्पन्न(रु.3 लाखाच्या आत).
कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी. सोबत लिंक https://forms.gle/Q485FSUQYEuL4xUx7 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ पुण्याचे विभागीय अधिकारी अमोल शिंदे यांनी कळविले आहे.
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा मार्फत कर्ज योजना
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी आणि Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे या योजनेची माहीती आणि अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे.
ज्या प्रकल्पाचे मूल्य रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत असेल त्यात एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के, व्याजदर 6 टक्के, परतफेडीचा कालावधी 6 वर्षाचा असेल. या कर्ज योजनेस पुढीलप्रमाणे पात्रता अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखा पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक),मृत्यु पावलेल्या व्यक्तींची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीकरिता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत, अ) महानगर पालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यु प्रमाणपत्र (आ) स्मशानभूमी प्राधिकारणाने दिलेली पावती. इ) एखादया गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र.
आवश्यक कागदपत्रे : मयत व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला (3 लाखा पर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा अशी आहेत.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा या लिंकवर https://forms,gle/7mG8CMecLknWGt6k7 वर भरण्यात यावी, अशी माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक पुणे यांनी कळविली आहे.