शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक मुंबई महापालिका प्रमाणे एक सदस्य पद्धतीने होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्याची चार वार्ड मिळून बनलेल्या प्रभागाची रचना बदलून पुन्हा नव्याने वार्ड रचना करावी लागणार आहे. असे झाल्यास सन 2007 नंतर म्हणजे तब्बल पंधरा वर्षानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये एक सदस्य पद्धतीने निवडणुका होतील. त्यामुळे शहराला 128 पेक्षा अधिक नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे.
नवीन वाढ रचनेबाबत विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये उत्सुकता लागली आहे. महा विकास आघाडीने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एक सदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अंतिम घोषणा होणे अजून बाकी आहे. यामुळे केवळ आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुका बाबत नगरसेवकांसह इच्छुकांना वेध लागले आहेत. शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या पुढे आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची लोकसंख्या लक्षात घेऊन काही वार्ड त्या वर्गासाठी आरक्षित केले जातील. तसेच महिलांसाठी वाढ आरक्षित केले जाते. कोरोना संक्रमणामुळे 2021 जनगणना पूर्ण न झाल्याने सन 2011 च्या जनगणनेच्या आधारे वार्ड रचना केली जाणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच निवडणूक विभागात पुन्हा नव्याने वार्ड रचना करावी लागणार आहे.वार्ड कमी क्षेत्रफळाचे असणार आहे. प्रभागा प्रमाणे भलेमोठे वाढ सांभाळण्याच्या कसरत इथून नगरसेवकांची सुटका होणार असली तरी सन 1992 ,1997 , 2007 ला एक सदस्य पद्धतीने निवड झाली होती. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षानंतर एक सदस्य पद्धतीने निवडणूक होतील. एक सदस्य वाढ रचनेचे अनेक नगरसेवकांनी स्वागत केले आहे.