शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या सारिका पवार (अधक्ष्य. राष्ट्रवादी काँगेस ओबीसी सेल पिं.चिं. शहर) यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्णा नगर व शिवतेज नगर परिसरातील दिव्यांग व ज्येष्ठ तसेच वृद्ध नागरिकांनी त्यांच्या घरीच करावे, याकरिता प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, पूर्णा नगर व शिवतेज नगर येथील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन कोरोना लसीकरण करण्यात आले.
Advertisement
या लसीकरणामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्याची वेळ आली नाही. त्यांना घरीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले. त्यामुळे या सर्व नागरिकांनी सारिका पवार यांचे आभार व्यक्त केले. तसेच मेडिकल टीमचे ही आभार व्यक्त केले.
Advertisement