शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दोनच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव यांनी आपल्या प्रभागातील पंत नगर, गणेश नगर ,दत्त नगर ,सहयोग नगर, रंगनाथ नगर ,गट नंबर 606 या परिसरात पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या सोडविली आहे.
प्रभागातील या भागात पाणी पुरवठा विभागामार्फत उद्भवणाऱ्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत होत्या या समस्यां बाबतच्या तक्रारी नगरसेविका अश्विनी जाधव व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्याकडे नागरिकांनी केल्या असता नगरसेविका अश्विनी जाधव व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर समस्या त्वरित सोडवाव्यात याच्या सूचना दिल्या पिण्याच्या पाण्याच्या या समस्येचे निराकरण पाणी पुरवठा विभागामार्फत पुढील एका आठवड्याच्या आत होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या पाण्याच्या समस्येचे निराकरण लवकरच अश्विनी जाधव यांच्या माध्यमातून होत असल्याने नागरिकांनी अश्विनी जाधव यांचे आभार व्यक्त केले