शबनम न्यूज / अहमदनगर
अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध झाली. त्यासाठी आज विशेष सभेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले होते.
Advertisement