शबनम न्यूज / पिंपरी
कोरोना च्या महामारी सारख्या संकटमयी काळामध्ये मागील 16 ते 17 महिने अविरत पणे वैद्यकीय सेवा देत डॉक्टरांनी देवदूत सारखे कार्य करून रुग्णांची सेवा केली असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले, डॉक्टर्स डे निमित्त सांगवी परिसरातील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयामधील डॉक्टरांचा सन्मान कार्यक्रम प्रसंगी महापौर बोलत होत्या,
आज राष्ट्रीय डॉक्टर्स डे या डॉक्टर्स डे निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संस्था जे डी ग्रुप वतीने सांगवी परिसरातील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय मधील सर्व डॉक्टर मित्र वर्गांचा सन्मान करून त्यांना भविष्यकाळातील त्यांच्या उज्वल भविष्य करिता महापौर यांनी शुभेच्छा दिल्या.
या सर्व डॉक्टर्स मित्रांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सौ विजया आंबेडकर, राजेश सावंत, युवा नेते जवाहर ढोरे ,उमेश ठाकरे , आदी मान्यवर उपस्थित होते