शबनम न्यूज / पुणे
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड मार्फत माहे जुलै 2021 करीता अनुज्ञप्ती शिबीर दौ-याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
खेड येथे 6, 7 व 8 जुलै, मंचर येथे 12, 13 व 14 जुलै, जुन्नर येथे 19,20 व 22 जुलै, वडगाव मावळ 26,27, व 28 जुलै या कालावधीत अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
Advertisement
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी अपॉईंटमेंट घेतलेल्या वेळेतच (As per Slot Booking) हजर व्हावे, जेणेकरुन गर्दी टाळणे शक्य होईल. सामाजिक अंतर पाळावे तसेच मास्क, हातमोजे व सॅनिटायझर याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.