शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लागू केलेल्या पे & पार्क धोरणास विरोध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.संजोग वाघेरे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने २०१४ पासून आजपर्यंत वेळोवेळी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. कधी नव्हे ते पेट्रोल १०४ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारकडून नागरिकांवर सुरू असलेला हा महागाईचा हा मारा असह्य होत आहे. यात नागरिक सर्वसामान्य नागरिकांना वाहने वापरावीत किंवा नाही, असा प्रश्न पडतो आहे . केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नागरिक त्रस्त असताना पिपंरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपकडून शहरवासीयांच्या खिश्याला कात्री लावणारी धोरणे राबविली जात आहेत.
अपापारदर्शक, भ्रष्टाचारी कारभारामुळे करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला जात आहे. तरी देखील शहरवासीयांकडून पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा हव्यास भाजपचा सुरू असल्याचे दिसते आहे. त्यासाठी भाजपने शहरात पार्किंग पॉलिसीला मान्यता दिली. या पार्किग पॉलिसीची १ जुलैपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बीआरटीएस विभागामार्फत अंमलबजावण करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांची चार भागात विभागणी करून तेथे खासगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट घेणारी एजन्सी सर्व ठिकाणी एक आहे.
यावरून इंधन दरवाढ, महागाईमुळे बेजार झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून आता वाहने उभी करण्याची पैसे घेऊन एकप्रकारे लुटीचा डाव आखलेला आहे. यासाठी शहरातील वाहतुकीचा शिस्त लावण्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु, या धोरणामागे सत्ताधारी भाजपचा खरा हेतू हा पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचा आहे. सद्यस्थितीत कोरोनासारखे भीषण संकट उभे ठाकलेलेले नागरिकांपुढे रोजी-रोटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधामुळे व्यावसाय, उद्योग -धंदे अडचणीत आले आहेत. लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहेत. या परस्थितीत घराबाहेर पडणा-या नागरिकांकडून वाहन उभे करण्यासाठी पैसे उकळणे योग्य नाही. प्रशासन सत्ताधा-यांच्या हेतुला सहकार्य करत असल्याचे दिसते आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चांगल्या पार्किग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्या ऐवजी नागरिकांवर आर्थिक भार टाकणे गैर आहे. याचा विचार करावा आणि तातडीने या धोरणाची अंमलबजावणी थांबवावी.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघोरे,माजी आमदार विलास लांडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिं चिं अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक अजित गव्हाणे,नगरसेवक मयूर कलाटे,नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर , नगरसेविका निकिता कदम, OBC सेल अध्यक्ष विजय लोखंडे,नगरसेवक विक्रांत लांडे,पक्ष प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे,महादेव पाटिल,पिं. चीं. राष्ट्रवादी काँग्रेस यु अध्यक्ष .वर्षा जगताप, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश विशाल काळभोर, संघटक राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश लाला चिंचवडे, कविता खलाटे, कुंभार मॅडम,उत्तम आल्हाट तसेच पक्षाचे सर्व नगरसेवक,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.