शबनम न्यूज / पिंपरी
चिंचवड गावठाणातील विकास कामे पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत मानवतेचा दृष्टीतून चिंचवड गावठाण, चापेकर उड्डाणपूलाखाली ‘पे ॲण्ड पार्क’ सुरू करु नये,अशी मागणी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.
सदर मागणीपत्रात मोरेश्वर शेडगे यांनी म्हंटले आहे कि, चिंचवड गावठाणात ‘प्रभाग 18’ मधे सध्या हेरिटेज प्रकल्पा अंतर्गत सिमेंट रस्ते तसेच नविन ड्रेनेज लाईन , स्ट्राॅम वाॅटर लाईन व पाणी पुरवठा विभागांची कामे सुरु आहेत. रस्ते, पाणीपुरवठा व ड्रेनेज पाईप लाईन या सर्व कामांसाठी चिंचवड गावठाणातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहे. रस्त्यांची खोदाई काम सुरु असताना जेसीबी कडून अनेक वेळा पाण्याच्या पाईप लाईन, ड्रेनेज लाईन, विजेच्या लाईन तुटने हे प्रकार वारंवार घडतात शिवाय रस्त्यांच्या खोदाईमुळे नागरिकांना चालता येणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे चिंचवड गावठाणातील नागरिक अत्यंत हैरान व हवालदिल झाले आहेत.
यांत चापेकर चौकातील उड्डान पुलाखाली ‘पे ॲण्ड पार्क’ सुरु केल्यामुळे नागरिकांमधे प्रचंड रोष वाढला आहे कारण नागरिकांनी कामांवर जाता येतां यावे या करिता आपापली वाहने कामावरून घरी आल्यावर चापेकर चौकातील उड्डानपुलाखाली पार्क करतात. कोरोना मुळे नागरिक आधीच अर्थिक विवंचनेत आहेत त्यात पे ॲण्ड पार्क मुळे त्यात अधिकच भर पडेल.
१) आपण चिंचवड गावठाणातील विकास कामे जलदगतीने पूर्ण करावीत.
२) विकासकामे सुरु असताना जेसीबी कडून अनेक वेळा पाण्याच्या पाईप लाईन, ड्रेनेज लाईन, विजेच्या लाईन तुटने हे प्रकार जेव्हा घडतात त्याचवेळी प्राधान्याने ते दुरूस्त केले गेले पाहीजे.
३) जोपर्यंत चिंचवड गावठाणातील विकास कामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत मानवतेचा दृष्टीतून चिंचवड गावठाण, चापेकर उड्डाणपूलाखाली ‘पे ॲण्ड पार्क’ सुरू करु नये. व तसे निर्देश आपण संबंधितांना द्यावेत, असे मोरेश्वर शेडगे यांनी दिलेल्या मागणीपत्रात म्हंटले आहे.