शबनम न्युज / पिंपरी
भाजप विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांचे नातलग संचालक असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार केला 520 कोटींच्या कामात एकशे दहा कोटी रुपये लाटल्याचा आरोप करत या कंपनीची चौकशी व्हावी तसेच आमदार प्रसाद लाड यांच्यावर ही कारवाई होऊन ईडी व कॅग मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुखांनी केली आहे
आज शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार ,शहर प्रमुख सचिन भोसले ,जिल्हा उप संघटिका वैशाली मराठी ,नगरसेविका मीनल यादव, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे व आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माहिती देताना सुलभा उबाळे यांनी सांगितले की
*पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे व Krystal Integrated Services Pvt Ltd. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार श्री. प्रसाद लाड यांच्या कुटुंबियांच्या नावे असल्याचे पुरावे सोबत देत आहोत. सर्व सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला आहे कि पिंपरी चिंचवड मनपा मध्ये ठेकेदारी पद्धतीबाबत असे नियम आहेत की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारीत सहभागी घेतला तर त्यांचे नगरसेवक पद रद्द होते असा कायदा असताना, भाजपा आमदार श्री. प्रसाद लाड यांच्या कुटुंबातील चार सदस्य असणाऱ्या कंपनीने स्मार्ट सिटी चे काम टेक महिंद्रा कंपनी कडून जॉईंट व्हेंचर मध्ये कसे घेतले. ? त्याचे पेपर ही सोबत जोडत आहोत.
*आमदार श्री प्रसाद लाड हे स्वतःच्या कंपनीमध्ये संचालक नसले तरी पिंपरी चिंचवड मनपा मध्ये ते वारंवार येतात त्याचे कारण काय ?
*स्मार्ट सिटी ॲग्रीमेंट मध्येच असणारे काही पुरावे, मी यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनी कडे आरटीआय मधून माहिती घेतली त्यात त्यांनी असे उत्तर दिले की ही निविदा आइटम नुसार काढली नसून प्रकल्पाच्या एकूण रकमेवर काढली आहे यातच यांनी सल्लागाराच्या मदतीने स्मार्ट चालाखी केली आहे व ३५० कोटी बजेट तरतूद असताना त्यांनी ५२० कोटी ला ही निविदा स्वीकृत केली आहे. त्यातले नं. १ ची चोरी आहे ९००० पाण्याचे मीटर ची खरेदी यात सात ते आठ प्रकारचे वॉटर मीटर आहे यात देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक वर्षी १० % याप्रमाणे वाढवून १० ते १५ हजार रुपये किमतीचा मीटर १ लाख रुपये किमती पर्यंत नेला आहे. Baylan ही कंपनी एम. आर. पी. मध्ये वॉरंटी सह दहा ते पंधरा हजारात हा मीटर विकते यात स्मार्ट सिटी चे ७२.६२ कोटी रुपये जास्त गेले असे आमचे म्हणणे आहे. १० हजाराच्या मीटरला पाच वर्षाचा देखभाल दुरुस्तीसाठी ६० हजार रुपये देणे हा सल्लागाराचा सल्ला कोणाच्या कामाचा. ?
(२)
*सर्वच रूमला लागणारे एकाच कंपनीचे व मॉडेल चे फायरवॉल याचे दर दोन वेगवेगळे दिलेले आहेत एकाचा दर ६६ लाख ४२ हजार ९४७ तर दुसऱ्याचा ६ कोटी ६ लाख ७३ हजार ६८४ एवढा आहे. प्रत्येकी २ यामध्ये ११ कोटी जास्त गेले आहेत.
*२५० KVA डिझेल जनरेटर साहित्यासहित इंस्टॉलेशन करणे ते स्वतः महिंद्रा कंपनीचे यांचा दर त्यांनी २ कोटी ५७ लाख ९१ हजार इतका दिला आहे तर महिंद्राच्या एम.आर.पी. मध्ये शासनाच्या पोर्टल वर त्यांचा रेट २१ लाख २६ हजार ६५५ रुपये इतका आहे येथे २ कोटी २० लाख रुपये जास्त दिसून येतात.
*डीले चार्जेस म्हणजे काम मुदतीत पूर्ण न केल्याचा दंड यांना पंचवीस ते तीस कोटी पर्यंत लावणे अपेक्षित असताना केवळ काही लाखांचा दंड दाखवण्यात आला आहे. यात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शा. नि. २९.०७.२०२० चा पेनल्टी रिलॅक्स कायद्याचा वापर करून मे २०१९ ला सुरू झालेले काम ज्याची मुदत १० महिने आहे जे मार्च २०२० ला संपणे अपेक्षित असताना अजूनही सदर काम संपलेले नाही. कोरोना सुरू होण्याच्या आधी मुदत संपलेली असताना कोरोनाचे कारण सांगून शासन निर्णयाचा उपयोग करून ८ संचालक मंडळाकडून सल्लागाराने अत्यंत शिताफीने दंड वाचवला आहे व तो संचालक मंडळाचा अधिकार असल्याचे सांगितले गेले परंतु हा जनतेचा पैसा आहे.
*सध्या ऑनलाईन Water Quality Analysis STP Monitoring System साठी लागणाऱ्या कंपनीचे Product बसविण्याचा विषय संचालक मंडळापुढे आहे. यात दर्जेदार कंपनी वगळून साध्या कंपनीकडून हे साहित्य घेऊन दहा कोटी लाटण्याचा डाव सुरू आहे. या बद्दल माननीय आयुक्तांनी कमिटी स्थापन करायला सांगितलेली आहे.
५२० कोटी च्या कामात ११० कोटी रुपये लाटणाऱ्या Krystal Integrated Services Pvt Ltd. कंपनीची चौकशी व्हावी व त्यांच्या नातलगांचे संचालक पदावर सहभाग असल्याने आमदार प्रसाद लाड यांची ईडी व कॅग (CAG)मार्फत चौकशी व्हावी व त्यांचे आमदार पद रद्द व्हावे.अन्यथा आम्हाला न्यायासाठी आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.