विशेष लेख
फालुन दाफा (ज्यास फालुन गोंग देखील म्हटल्या जाते) ही मन आणि शरीर यांचा विकास करणारी एक उच्चस्तरीय प्राचीन साधना प्रणाली आहे. ही साधना पद्धती विश्वाचे तीन आधारभूत सिध्दान्त सत्य, करुणा, सहनशीलता यावर आधारित आहे.
फालुन दाफा सर्वप्रथम चीनमध्ये १९९२ साली गुरू ली होंगज़ी द्वारा सार्वजानिक केला गेला. आज जगातील ९० हून अधिक देशात, १० करोडपेक्षा अधिक साधकांनी या साधना अभ्यासाला आत्मसात केलेले आहे. भारतात देखील फालुन दाफाचा अभ्यास केल्या तसेच शिकविल्या जातो.
फालुन दाफा साधना:
फालुन दाफा एक सशरीर साधना आहे ज्यात मन आणि शरीर दोन्ही स्तरांवर साधकाचे परिवर्तन होते.
१) मनाची साधना : फालुन दाफा मध्ये सर्वप्रथम व्यक्तिच्या नैतिक गुणांवर वा मनाची साधना करण्यावर भर दिल्या जातो. मनाच्या साधनेचे अनेक पैलू आहेत जसे, वाईट विचार आणि सवईंचा त्याग करणे, विभिन्न मोहभावांचा त्याग करणे, दुर्व्यवहार सोडणे, आध्यात्मिक रित्या नफा तोटा ह्याची खऱ्या अर्थानी समज अशा पुष्कळ गोष्टी समाविष्ट आहेत. अंततः विश्वाची प्रकृती सत्य-करुणा-सहनशीलता या तत्वांचा रोजच्या आयुष्यात समावेश करणे, त्यांना आत्मसात करणे आणि साधना पूर्ण करणे हा उद्देश आहे. यासाठी जुआन फालुन या पुस्तकाचा नियमित अभ्यास आवश्यक आहे.
फालुन दाफा अभ्यासाचे संकलन श्री ली होंगज़ी लिखित निम्न पुस्तकात उपलब्ध आहे :
फालुन गोंग : फालुन दाफा सिद्धांताविषयी चर्चा आणि अभ्यासाचे वर्णन फालुन गोंग पुस्तकांत दिले गेले आहे. व्यायाम कसे करावे हे छायाचित्रांद्वारे स्पष्ट केले गेले आहे.
जुआन फालुन : गुरु ली होंगज़ी यांचे नऊ उपदेशांचे संग्रह असेलेले जुआन फालुन हे एक मार्गदर्शक तसेच मुख्य पुस्तक आहे.
२) शरीराची साधना : फालुन दाफा मध्ये साध्या, सौम्य प्रभावी अशा पाच व्यायामांचा समावेश आहे .
हे व्यायाम शरीराचे शुद्धीकरण आणि संवर्धन करतात. नैतिकगुणांच्या विकासासोबतच व्यायाम केल्याने शरीरात कमी वेळेतच आश्चर्यजनक लाभ दिसून येतो. पुस्तक “Life and Hope Renewed – The Healing Power
of Falun Dafa” मध्ये फालुन दाफा अभ्यासा द्वारे अनेक साधकांचे गंभीर तसेच प्राणघातक आजारांपासून मुक्त झाल्याचे अनुभव संकलित आहेत. हे पुस्तक http://en.minghui.org/html/articles/2005/4/3/59184.html
वरून डाउनलोड केले जाऊ शकते.
फालुन दाफा ह्याची पुस्तकें, व्यायाम निर्देश ,अधिक माहिती या वेबसाइट www.falundafa.org आणि www.falundafaindia.org वर उपलब्ध आहे.
चीन मध्ये दडपशाही:
फालुन गोंग अभ्यास आज जगभरात लोकप्रिय आहे. परंतु खेदजनक बाब म्हणजे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 1999 पासून फालुन दाफा याचे जन्मस्थान असलेल्या चीन मध्येच त्याला दडपले जात आहे. गेल्या 21 वर्षांपासून, फालुन दाफा अभ्यासक या याचा शांततापूर्ण विरोध करत आहेत. हे विचारणीय आहे कि इतके अत्याचार सहन करूनही फालुन दाफा चे साधक त्यांच्या विश्वासावर खंबीरपणे टिकून आहेत आणि या आध्यात्मिक साधनेत सातत्याने प्रगती करत आहेत. सखोल विचार केल्यास, असे जाणवते कि हा एका आध्यात्मिक साधनेचा जी मानवाला मुक्ती चा मार्ग दाखवते दुष्ट शक्ती द्वारे केवळ भीतीपोटी केल्या जात असणारा विरोध आहे.
फालुन दाफा कसा शिकवा :
फालुन दाफाचा अभ्यास आपल्या देशांत अनेक वर्षापासून केला जात आहे. कोरोना काळात बाह्य गतिविधी करणे मर्यादित असल्यामुळे हा अभ्यास ऑनलाईन शिकविल्या जात आहे.शिकण्यास इच्छुक असल्यास www.learnfalungong.in वर वेबिनार साठी नि:शुल्क रजिस्टर करू शकता किंवा संपर्क करावा: नागपूर : 9822569386 पुणे : 7720006453, 9004250296, मुंबई : 9987645170
हा अभ्यास ज्येष्ठ नागरिक, मुले, तरुण यांच्यासह सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. फालुन दाफाचे सर्व उपक्रम स्वयंसेवकां द्वारे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केले जातात. फालुन दाफा मध्ये वेळ, स्थान आणि दिशेचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही प्रकारचे सदस्यत्व किंवा बंधन नाही. सर्व संस्कृती आणि वयोगटासाठी सुगम असलेला फालुन दाफा सदैव नि: शुल्क शिकविल्या जातो.