शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक शैलेश मोरे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या प्रभाग क्रमांक 19 मधील एम्पायर इस्टेट सोसायटीतील सदस्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दोन दिवसाच्या या शिबीरात जवळपास 538 नागरिकांनी लसीकरण केले , हे शिबीर शनिवार व रविवार रोजी सोसायटीच्या क्लब हाऊस क्रमांक एक मध्ये संपन्न झाले सदर लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी फिनिक्स हॉस्पिटल,, पिंपरीतील वायसीएम, चिंचवड आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी संपन्न झाले ,डॉक्टर माधव चव्हाण, एम्पायर स्टेट फेडरेशनचे पदाधिकारी व रहिवाशांच्या परिश्रमामुळे सदर शिबिर यशस्वीपणे पार पडले.
संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे त्यामुळेच हे दोनदिवसीय कोरणा प्रतिबंधात्मक लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात आल्याचे नगरसेवक शैलेश मोरे यांनी सांगितले