शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराती फ प्रभाग क्र.12 मधील ताम्हाणे वस्ती, टॉवर लाईन, तुळजाभवानी चौक येथे रबरी गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे प्रवीण धोंडाप्पा पाटील ( शिवसेना शाखाप्रमुख, ताम्हाणे वस्ती, चिखली पिंपरी चिंचवड पुणे ) यांनी कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग व प्रभाग यांना दिले आहे.
सदर निवेदनात प्रवीण पाटील यांनी म्हटले आहे की, फ प्रभाग क्रमांक 12 मधील ताम्हाणे वस्ती हनुमान नगर हा दाट लोकवस्तीचा भाग असून, याठिकाणी मंदिर, शाळा, भाजी मार्केट असून या ठिकाणी नेहमी वाहनांची वर्दळ वाढत असून, सदरच्या परिसरात वाहने जोरात चालवण्यात येतात .परिणामी, दररोज आई तुळजा भवानी चौक या ठिकाणी अपघात वाहनांची एकासमोर धडक यातून एकमेकांची शिवीगाळ, हाणामारी सारखे प्रकार घडतात. परिसरात नागरिकांच्या तक्रारी समोर येत आहे .यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून व सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून या भागात रबरी गतिरोधक (rubber speed breaker) बसविण्यात यावे. तसेच हा चौक चार दिशा वाहतूक असून, सदर रस्ता अंतर्गत असल्यामुळे या ठिकाणी सिग्नल असल्याने रोज अपघात होत असतात. तसेच या भागात दोन शाळा आहेत. कोरोना नंतर शाळा सुरू झाल्यावर लहान मुला- मुली यांचा वावर वाढणार असून आपण सदर स्थळी भेट देऊन पाहणी करावी, व रबरी गतिरोधक बसविण्यात यावे.
सदर प्रस्तावाचा आपण सकारात्मक विचार करावा, लवकरात लवकर काम सुरू करावे, असेही प्रवीण पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.