शबनम न्युज / पिंपरी
दापोडी गणेशनगर येथील सोसायट्यामध्ये तात्काळ लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके यांनी अति.वैद्यकिय आरोग्य अधिकारी डाॅ.पवन साळवे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग क्र. ३० दापोडी येथील लसीकरण केंद्रावर कायम गर्दी असते. मोजक्याच लस उपलब्ध असल्याने सोसायटीतील नोकरदारवर्ग व वयोवृद्ध नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. तरी कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका पाहता लसीकरण जलद गतीने करणे गरजेचे आहे. गणेशनगर येथील सर्व सोसायटीमधे एकदिवसीय लसीकरण सुरू करण्यात यावे याबाबचे निवेदन अति.वैद्यकिय आरोग्य अधिकारी डाॅ.पवन साळवे यांना पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके यांच्या हस्ते देण्यात आले.
Advertisement