शबनम न्युज / पिंपरी
दिवंगत माजी खासदार आणि सुप्रसिध्द अभिनेते दिलीपकुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रतिभासंपन्न आणि लोकप्रिय अभिनेते होते अशा शब्दात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिलीपकुमार यांना महानगपालिकेच्या वतीने श्रध्दांजली वाहिली.
राज्यसभेचे माजी खासदार चिंत्रपट अभिनेते दिलीपकुमार यांचे आज निधन झाल्याचे वृत्त कळल्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महापौर ढोरे म्हणाल्या दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांची लोकप्रियता अफाट होती. भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना चित्रपटातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील एक तेजस्वी झगमगणारा तारा निखळून पडला आहे असेही त्या म्हणाल्या.
Advertisement