शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी, दि. ७ जुलै २०२१ :- शहरातील इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जिगची सोय व्हावी यासाठी बी.यु. भंडारी (एम.जी.मोटार्स) यांचेकडून उभारण्यात आलेल्या सुपर चार्जर पॉईंटचा उदघाटन सोहळा महापौर सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बी.यू.भंडारी ऍटो लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. शैलेश भंडारी प्रादेशिक परिवहन विभागाचे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अजय अवताडे, बी.यू.भंडारी सर्व्हिसेसचे जनरल मॅनेजर श्री. ऋषिकेश पुरंदरे, श्रीम. वैजयंती शेवडे, श्री.नायर, श्री.गोपी पवार आदी उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल तसेच इतर इंधनावर चालणा-या वाहनांच्या धुरापासून निर्माण होणा-या वायू प्रदुषणामुळे पर्यावरणास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय उपलब्ध आहे. तेंव्हा अशा इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जिंगची गरज व सोय लक्षात घेऊन बी.यु.भंडारी यांनी पुढाकार घेत शहरातील सयाजी हॉटेलसमोर, पुणे-मुंबई रोड वाकड महामार्ग येथे चार्जिग स्टेशन उभारले आहे. शहराचे पर्यावरण प्रदुषणमुक्त व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त वाहनधारकांनी इलेक्ट्रीक व्हेईकल्सचा वापर करुन आपले पिंपरी चिंचवड शहर हे प्रदुषणमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणे व पुढाकार घेणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे असे मत महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी आज सुपर चार्जर पॉईटचे उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.