नागपूर : नागपूरमध्ये गुन्हेगारी घटनाचं सत्र सुरूच आहे. शहरातील पांढराबोडी भागात एक गुंडाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गँगवार मधूनही ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली. अक्षय जयपूर असं मृतकचे नाव आहे. अक्षय हा गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्हे दाखल होते. सहा महिन्याआधीच तो जेलमधून बाहेर आला होता.
राजीव गांधींच्या पुतळ्यावर पेट्रोल फेकून लावली आग, व्हायरल नंतर कारवाई
बुधवारी रात्री अक्षय हा पांढराबोडी परिसरात आल्याची माहिती आरोपांना मिळाली होती.
त्यानंतर चौघांनी जाऊन अक्षयला घेरले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून पळून गेले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. अवैध दारूविक्रीच्या वादातून प्रतिस्पर्धी टोळीने अक्षयची हत्या केल्याचे प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे