- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली शहर शिवसेना पदाधिकार्यांची बैठक
- आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पन्नास नगरसेवक निवडून येतील ; खासदार संजय राऊत यांचे भाकीत
शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात आज खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आगामी महापौर शिवसेनेचाच असेल असे सांगत शिवसेना कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना व मार्गदर्शन संजय राऊत यांनी केले. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सांगितले की, आगामी महानगरपालिकेची तयारी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. या अनुषंगानेच पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांची आज बैठक झाली. यावेळी आगामी महानगर पालिकेत शिवसेनेचा महापौर बसवायचा. या करिता शिवसेनेचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहे. भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, पिंपरी चिंचवड मागील पाच वर्षात झालेले नाही. हाच मुद्दा घेऊन भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड असा नारा देत शिवसेनाही महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आणि आम्ही दाखवून देऊ महापालिका कशी चालवायची,शहर कसे सांभाळायचे.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कडून भाजप मध्ये गेलेले नगरसेवकच परत राष्ट्रवादीमध्ये येतील. तसेच शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त शहरात निवडून येतील व भाजप यावेळी महानगर पालिका काबीज करू शकणार नाही. व सतत पक्ष बदलणारे हे स्वतःसाठी पक्ष बदलत असतात.
राष्ट्रवादीबरोबर आगामी महानगर पालिकेत आघाडी करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले की, सन्मानजनक जागा मिळाली तर आम्ही राष्ट्रवादीशी आघाडी करू, नाहीतर आम्ही आमचे नगरसेवक स्वतंत्ररित्या लढविण्यास तयार आहोत. आम्ही असं म्हणतच नाही की, राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही. शेवटी राज्यात महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोतच.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मुंबईचे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत सांगताना संजय राऊत यांनी सांगितले की, आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत तक्रार राज्य शासनाकडे आली आहे. आम्ही त्यावर योग्य ती कारवाई करू, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या जे काही चालले आहे. सत्ताधारी मार्फत ती जनतेची लूट आहे.
तसेच एका पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसचे आहे. व अध्यक्ष कोण होईल? हे काँग्रेसच ठरवणार. तसेच शेवटी पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राव यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आमचे कमीत कमी पन्नास नगरसेवक निवडून येतील.
शिवसेनेचे पश्चिम आणि पश्चिम उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख खासदार संजय राऊत यांची चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, राज्य संघटक गोविंद घोळवे, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक,कामगारनेते इरफान सय्यद , माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, सह संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड योगेश बाबर, , पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शैला खंडागळे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंता को-हाळे, धनंजय आल्हाट, गटनेते राहूल कलाटे आदी उपस्थित होते