शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये विनायक नगर येथील शिवशंभो कॉलोनी च्या नागरिकांना मागील नऊ वर्षापासून महानगरपालिकेच्या पिण्याचे पाणी मिळत नव्हते शिवशंभो कॉलनी मध्ये गेली 9 वर्षे येथील बिल्डरांनी एक ते दोन गुंठे चे प्लॉटिंग करून ते नागरिकांना विकले पण त्या जागेला येणारा रस्ता दुसऱ्या शेतकऱ्यांचा असल्यामुळे नागरिकांना महानगरपालिकेची पिण्याचे पाईपलाईन टाकता येत नव्हती त्यामुळे नागरिकांना आपापल्या जागेमध्ये बोरवेल घेऊन पाणी चा वापर करावा लागत होता या सर्व अडचणींची माहिती घेऊन मागील चार वर्षापासून या प्रभागातील भाजप नगरसेविका सारिका नितीन बोऱ्हाडे यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले असून तब्बल नऊ वर्षानंतर विनायक नगर शिवशंभो कॉलनी च्या नागरिकांना आता महानगरपालिकेचे पिण्याचे पाणी मिळणार आहेत येथील खाजगी जागा मालक विलास जेऊरकर यांनी याकरिता त्यांच्या जागे मधून 12 मीटर रोड या कामासाठी दिला आहे त्यामुळे त्यांचेही सारिका बोऱ्हाडे यांनी आभार व्यक्त केले
या वेळी आपल्या प्रतिक्रिया देताना नगरसेविका सारिका नितीन बोऱ्हाडे यांनी सांगतले कि आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने हा नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला , चार वर्षे शिवशंभो सोसायटी मधिल रस्ता व पाण्याचा प्रश्न होता.सोसायटी शेजारील चारही बाजु नी खाजगी जागा असल्यामुळे खुप अडचणी येत होत्या .त्या तील एक खाजगी जागा मालक जेऊरकर साहेब यांनी त्यांच्या जागेमधुन 12मी रस्ता व पिण्याच्या पाईप लाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली या बद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद करते व आभार व्यक्त करते
—— नगरसेविका सौ.सारिकाताई नितिन बो-हाडे
प्रभाग क्रमांक दोन मधील शिवशंभू कॉलनीतल्या रहिवासी नागरिकांनीही नगरसेविका सौ सारिका नितीन बोऱ्हाडे व विलास जेऊरकर यांचे आभार व्यक्त केले
विलास जेऊरकर यांनी आपल्या जागेतून बारा मीटर रस्ता पिण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी दिला त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की नगरसेविका सारिका बोऱ्हाडे व त्यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी मला भेटून सांगितले की शिवशंभु कॉलनीतील रहिवाशांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि हा नऊ वर्षापासून प्रलंबित असा प्रश्न असून पिण्याची पाईपलाईन टाकण्या करिता तुमच्या जमिनीतून जागा द्या, पिण्याचे पाणी पुरवणे हे पुण्याचे काम आहे त्यांनी दिलेला प्रस्ताव पाहून मला आनंद झाला , की आपल्याकडून कोणाच तरी एक मोठं काम होत आहे , मी या कामासाठी परवानगी दिली नगरसेविका सारिका बोऱ्हाडे व नितीन बोऱ्हाडे यांनी खूप धावपळ केली मेहनत घेतली आणि हे काम मार्गी लावले आणि त्यातून या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नगरसेविका सारिका बोऱ्हाडेव नितीन बोऱ्हाडे तसेच शिवशंभो कॉलनीतील रहिवासी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो
यावेळी शिवशंभो कॉलनीतील सर्व रहिवासी नागरिक उपस्थित होते