पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली व पक्षाच्या जुन्या मातबर शिलेदारांना व युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पालिकेत महाविकासाआघाडीची सत्ता आणून म. वि. आ. चा महापौर कसा बनवता येईल या विषयी कानमंत्र दिला . यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आझमभाई पानसरे , आमदार अण्णा बनसोडे , माजी आमदार विलास लांडे , यांनी त्यांचे स्वागत केले
एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गणली जाणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज या पालिकेवर कर्ज रोखी उभारण्याची वेळ आली आहे . गेल्या चार वर्षा पासून पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे , पालिकेच्या भोंगळ कारभाराला सामान्य जनता वैतागली आहे . कोरोना काळात पालिकेकडून भली मोठी आश्वासने देऊन ती न पाळून जनतेचा भ्रमनिरास केला आहे , या कोरोनाच्या महामारीत व्यावसायिकांचे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना पे अँड पार्क सारख्या योजना राबविण्यात आल्या ,ऐन पावसाळ्यात रस्ते खुदाईची कामे सुरु असून झोपडपट्टी व नागरी वस्तीतील लोकांना नाहक त्रास देण्याचे काम सुरु आहे . जनहितार्थ कामे करण्या ऐवजी जाहिरात बाजीवर भाजपाचा जास्त भर आहे असल्याचे दिसून येत आहे .
या सर्व अडचणी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या कानावर घातल्या , यावर प्रदेशाध्यक्षांनी सामान्य कार्यकर्त्या पासून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वानी एकजुटीने काम करून पक्ष संघटन कसे वाढवता येईल ,व पालिकेतील संख्या बळ कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या . तसेच शहरातील सामान्य जनतेच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावा . तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून शहरातील नागरिक कसे सुरक्षित राहतील यावर जास्तीत जास्त प्रबोधन करण्यात यावे .
यावेळी त्यांनी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाची ही पाहणी केली , बूथ कमिटी मजबून करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचा आढावा घेतला व त्याचे कौतुक केले . कार्यालयातून सामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाच्या शासकीय योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात याचा देखील आढावा घेतला
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आझमभाई पानसरे , आमदार अण्णा बनसोडे , माजी आमदार विलास लांडे , माजी नगर सेवक जगदीश शेट्टी , निलेश शिंदे , ,नगरसेवक विक्रांत लांडे , बाळासाहेब ठाणगे , प्रसाद शेट्टी , प्रतीक इंगळे ,शशीकांत घुले , सुधाकर भोसले ,निहाल पानसरे , सयाजीराव पाटील , संजय औसरमल, शेखर कुटे , कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते , हे उपस्थित होते .