शबनम न्यूज / पिंपरी
कोरोना काळात सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडली असे असताना महिलांनी गृह उद्योगातून आपले कुटुंब सांभाळले आता शासनाने निर्बंध शिथिल केले आहे तरी गृहोद्योगातून तयार केलेल्या वस्तू व्यवसायाला पाठबळ मिळणे आवश्यक आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता या महिला मेळाव्याचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या उपस्थितीत सदर चे उद्घाटन संपन्न झाले यावेळी नगरसेवक सागर आंघोळकर, नगरसेविका उषा मुंडे ,स्विकृत सदस्य महेश जगताप ,शिवाजी कदम, महालक्ष्मी महिला संस्थेच्या नंदा अहिरे, किरण जगताप ,ज्ञानेश्वर जगताप आदी उपस्थित होते.
सदर मेळाव्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप यांनी केले परिसरातील महिलांनी या संधीचा लाभ घेत वस्तू ,कपडे, खाद्यपदार्थ ,लोणचे, शोभेच्या वस्तू, सौंदर्यप्रसाधने ,आदी साहित्याचे स्टॉल लावले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा सोनकांबळे यांनी केले