शबनम न्यूज / मावळ
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अमितदादा घेनंद मित्र परिवार व विघ्नहर्ता क्रिकेट क्लब देहू आयोजित नगरसेवक चषक २०२१ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेत शिवनेरी लायन्स या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत नगरसेवक चषकावर आपले नाव कोरले व द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. सिंहगड फायटर्स, तृतीय क्रमांक राजगड रॉयल्स आणि चतुर्थ क्रमांक प्रतापगड वॉरियर्स या संघाने पटकवला. या स्पर्धेत उत्कृष्ठ फलंदाज ऋषिकेश चव्हाण, उत्कृष्ठ गोलंदाज कुणाल बोरसे, यष्टीरक्षक नितीन शेलार, उत्कृष्ठ झेल अतुल गिरी, उत्कृष्ठ थ्रो ओम लोंढे व निर्धाव षटक आबा लोहार आणि संपूर्ण स्पर्धेत १ अर्धशतक आणि ९७ धावा व ४ विकेट घेत सांघिक कामगिरी करणारे अमित घेनंद हे मॅन ऑफ द सिरीज या किताबाचे मानकरी ठरले.
या स्पर्धेला प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश जाधव, मा.सरपंच कांतीलाल काळोखे,सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाळासाहेब काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष माणिक जाधव, विठ्ठल काळोखे,तुकाराम काळोखे,गणेश काळोखे,विलास हगवणे,प्रशांत बेंडभर,संदीप देसाई,विजय सुतार,संदीप गार्डे,विलास चव्हाण,दत्ता धोंडगे,सुनिल माळी,संतोष माळी,अभिजित अजगेकर,मिलिंद खरात,सुहास कांबळे,संदीप गिरी,दिनकर मोरे, नवनाथ बडे,विश्वास पाटील, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि विघ्नहर्ता सोसायटी, चैतन्य पार्क सोसायटी मधील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व या स्पर्धेचे सूत्रसंचालन दिपक राजगुरू यांनी केले.