शाहूनगर संभाजीनगर कस्तुरी मार्केट परिसरातील नागरिकांच्या विजेच्या समस्या आमदार बनसोडे यांनी जाणून घेऊन तात्काळ सोडवण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड , प्रभाग क्रमांक १० मधील गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्यांचा सामना करत आहेत , त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्याचे निवारण करण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी स्वतः जाऊन नागरिकांची भेट घेतली व त्याच्या विविध समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निवारण करण्याच्या सूचना दिल्या .
सोमवारी सकाळी आमदार बनसोडे यांनी नगरसेविका मंगलाताई कदम यांच्या जनसपंर्क कार्यालयावर जाऊन नागरिकांची भेट घेतली व त्यांच्या प्रभागातील तक्रारी जाणून घेतल्या या वेळी उपस्थित नागरिकांनी आमदारांसमोर समस्यांचा पाढा च वाचला. कुठे सोसायट्या मध्ये पावसाचे पाणी साचते तर कुठे पेविंग ब्लॉक निघालेत , कुठे ड्रेनेज लाईनचे काम करताना रस्ते खोदलेत लोकांना येण्याजाण्यासाठी त्रास होत आहे , तर कुठे पावसाचे पाणी सोसायटी मध्ये येऊन पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात जाते , यासोबत महावितरणा बाबत देखील अनेक तक्रारी करण्यात आल्या त्यात फिडर ला अडथळा आणणाऱ्या फांद्यां, वीज वाहणाऱ्या तारांचा झोल कमी करणे फिडर पिलर मधील खराब झालेले पार्ट्स व दरवाजे बदलणे , दुरुस्ती कामामुळे वारंवार वीज खंडित होत असते , त्यामुळे घरातील उपकरणे निकामी होतात यासाठी आठवड्यात दर गुरुवारी वीज दुरुस्ती ची कामे करण्यात यावी, थकीत वीज बिलांचे सुलभ हप्ते करून देणे , तसेच वीज कनेक्शन कट करण्यापूर्वी वीज ग्राहकांना किमान २ दिवस आधी कल्पना देणे ,तसेच खंडित वीज पुरवठा बाबत तक्रारी मध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे व तक्रार करून २ दिवस त्याची तक्रारिची दखल घेतली जात नाही, अश्या अनेक समस्या आमदारांपुढे मांडल्या .
आमदार बनसोडे यांनी वैयक्तिक प्रत्येकाची तक्रार जाणून घेत संबधित अधिकार्यांना यासंदर्भात तातडीने कारवाई करून भागात वारंवार निर्माण होत असलेल्या विजेच्या समस्या सोडवाव्यात असे सांगितले . तसेच हाउसिंग सोसायटीच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले .