शबनम न्यूज / भोसरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यानुसार, प्रत्येक लोकप्रतिनिधी या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. या महानगरपालिकेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात मतदार नोंदणी मदत कक्ष सुरू केला आहे.
या मदत कक्षात ऑनलाइन मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी या आपल्या जनसंपर्क कार्यालयावतीने सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षाची सहाय्यता घ्यावी, तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, तसेच युवक युवती नवीन मतदारांनी या उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे नगरसेवक संजय वाबळे यांनी म्हंटले आहे.
मतदार नोंदणी करिता लागणारी कागदपत्रे भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, रेंट एग्रीमेंट, लाईट बिल किंवा गॅस कनेक्शन बिल यापैकी एक पत्त्याचा पुरावा म्हणून लागणार आहे. तसेच जन्माचा पुरावा म्हणून जन्मदाखला किंवा दहावीचे सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड व एक पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मतदार नोंदणी मंचच्या सहाय्याने आपली मतदार नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेवक संजय वाबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.