फालुन दाफा – जगभरात लोकप्रिय पण चीनमधील शोषणाचा बळी
20 जुलै रोजी चीनमध्ये फालुन दाफाच्या दडपशाहीची बावीस वर्षे पूर्ण – जाणून घ्या ते कसे संबंधित आहे भारताशी
जगातील 100 पेक्षा अधिक देशांमधील 100 दशलक्षाहूनही अधिक लोक फालुन दाफाचा अभ्यास करत आहेत. पण खेदजनक बाब म्हणजे चीन, जे फालुन दाफा यांचे जन्मस्थान आहे, तेथे 20 जुलै,1999 पासून ह्याला दडपले जात जे आजपर्यंत कायम आहे. 20 जुलै हा दिवस जगभरातील फालुन दाफा अभ्यासूं द्वारे विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि शांततापूर्ण निदर्शने व मेणबत्या जळवून लोकांना चीनमधील बर्बर दडपशाहीबद्दल जागरूक केले जाते.
फालुन दाफा (फालुन गोंग म्हणूनही ओळखले जाते) ही बुद्ध आणि ताओ विचारांवर आधारित एक प्राचीन साधना पद्धती आहे जी श्री. ली होंगज़ी यांनी 1992 मध्ये चीनमध्ये सार्वजनिक केली. फालुन दाफा आणि त्याचे संस्थापक श्री. ली होंगझी यांना जगभरातील 1500 हून अधिक पुरस्कार आणि प्रशस्तिपपत्रे देऊन गौरविण्यात आले आहे. फालुन दाफा हि साधना पद्धती ब्रह्मांडाचे तीन सिद्धांत सत्य, करुणा, सहनशीलता यावर आधारित आहे. फालुन दाफा एक सशरीर साधना आहे ज्यात मन आणि शरीर दोन्ही स्तरांवर साधकाचे परिवर्तन होते. सर्व संस्कृती आणि वयोगटासाठी सुगम असलेला फालुन दाफा स्वयंसेवकां द्वारे सदैव नि: शुल्क शिकविल्या जातो.
चीनमधील फालुन गोंगवरील दडपशाही:
फालुन दाफाचे आरोग्यविषयक फायदे आणि आध्यात्मिक शिकवणींमुळे फालुन गोंग चीनमध्ये इतका लोकप्रिय झाला की 1999 पर्यंत जवळजवळ 70 ते 100 दशलक्ष लोक याचा अभ्यास करायला लागले. त्यावेळी चिनी कम्युनिस्ट पार्टीचे सदस्यत्व केवळ 60 दशलक्ष होते. चीनी कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी फालुन गोंगचा शांतताप्रिय स्वभाव असूनही, याला त्यांच्या सार्वभौमत्वासाठी धोका असल्याचे समजले आणि 20 जुलै 1999. रोजी त्यावर बंदी घातली आणि काही महिन्यांतच फालुन दाफाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी मोहीम राबविली, जी आजही कायम आहे.
चीनमध्ये बेकायदेशीर मानवी अवयव प्रत्यारोपण गुन्हा:
हे अविश्वसनीय वाटेल, परंतु चीनमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव केवळ मृत्युदंडाच्या शिक्षा झालेल्या कैद्यांमधूनच नव्हे, तर मोठ्या संख्येने तुरुंगात असलेल्या फालुन गोंग प्रॅक्टीशनर्सकडून येतात. स्वतंत्र तपासणीत असे दिसून आले आहे की, सरकारी रुग्णालयांच्या संगनमताने चिनी शासन, कैद्यांच्या बेकायदेशीर मानवी अवयव प्रत्यारोपणाच्या गुन्ह्यात सहभागी आहे. या विषयावरील अधिक माहितीसाठी संकेतस्थळ:: www.endtransplantabuse.org
भारतातही 20 जुलै रोजी निषेध दिवास साजरा केला जाईल:
जगभरातील फालुन दाफा अभ्यासूं प्रमाणे भारतातील फालुन दाफा अभ्यासक देखील 20 जुलै रोजी शांततापूर्ण निदर्शने आणि कैंडल लाइट विजिल चे आयोजन करतात. सध्याच्या परिस्थितीत बाह्य गतिविधींवर मर्यादा असल्याकारणामुळे, भारतातील फालुन दाफा अभ्यासूं यावर्षी सोशल आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून चीनमधील दडपशाहीबद्दल लोकांना जागरूक करीत आहेत.
फालुन दाफाचा अभ्यास 2000 पासून भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये केला जात आहे. आपल्याला देखील ही साधना पद्धती शिकण्यास स्वारस्य असल्यास www.learnfalungong.in येथे आपण त्याच्या विनामूल्य वेबिनारसाठी नोंदणी करू शकता. फालुन दाफा बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आवश्य भेट द्यावी : www.falaundafa.org
हा विषय भारताशी संबंधित कसा आहे?
भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण आहेत. भारतावर दबाव आणण्यासाठी चीन मसूद अझर समर्थन, अरुणाचल प्रदेश, लडाख सीमा विवाद इत्यादींचा वापर करीत आहे. भारताची कडक भूमिका आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेमुळे चीनला भारताच्या सामर्थ्याची कल्पना आलेली आहे.
चिनी कम्युनिस्ट पार्टीची नीती आणि धोरणे त्या सगळ्यागोष्टींचा विरोध करतात ज्याचे भारत (ज्याच्याजवळ एक प्राचीन संस्कृती आणि सर्वसमावेशक आधुनिक लोकशाही जिचा सत्य,करुणा,सहनशीलता यावर दृढ विश्वास आहे ) प्रतिनिधित्व करतो. भारताजवळ चिनी कम्युनिस्ट पार्टीला शिकवण्यासाठी बरेच काही आहे. चीनमध्ये तिबेट बौद्ध, विगर मुस्लिम आणि फालुन गोंग यांच्यावर झालेल्या भयंकर मानवाधिकार गुन्ह्यांचा भारताने निषेध करावा. ही विचारसरणी भारताला विश्वगुरूंचा दर्जा देऊ शकते. आपण पुन्हा हे सिद्ध करू शकतो कि भारत नेहेमीप्रमाणे सत्याच्या बाजूने ठामपणे उभा आहे.